Friday, April 11, 2025
Homeताज्या घडामोडीबीडीडी चाळवासीयांना गृहप्रवेशाचा मुहूर्त मिळेना ?

बीडीडी चाळवासीयांना गृहप्रवेशाचा मुहूर्त मिळेना ?

पाडव्याचा मुहूर्त हुकला… चावीसाठी प्रतीक्षाच …

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत अतिशय झपाटयाने असंख्य भागांमध्ये पुनर्विकासाच्या कामांना वेग आला असून, आता शहरातील बीडीडी चालींचा पुनर्विकासही प्रगतीपथावर दिसत आहे. साधारण काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्त्वाची वस्ती असणाऱ्या या बोडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या नव्या पराचा ताबा यंदाच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मिळेल असे सांगण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र हा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. ना. म. जोशी मार्ग इथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सातपैकी दोन इमारती डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील असे माडाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी एका बैठकीत स्पष्ट केले.

या इमारतीचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना एप्रिल २०२६ पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली जाईल. त्यामुळे वर्षभरानंतरच नव्या परात पाऊल ठेवण्याची संधी बीबीडी चाळीतील रहिवाशांना मिळणार आहे. नुकतीच बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम कुठवर आले यासंदर्भातील माहिती आणि प्रकल्पाचा आढावा घेण्याराली प्रकल्पस्थळी एक बैठक पार पडली. जिथं इमारतीमध्ये २४ तास पाणीपुरवठा, गॅसची जोडणी, खिडक्यांना ग्रील आणि वरजीप्रमाणे स्वतंत्र पार्किंग, यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली.

सदर बैठकीसाठी म्हाडाचे अधिकारी, बांधकाम कंत्राटदार आणि स्थानिक रहिवाशांची उपस्थिती होती. एकीकडे रहिवासी पहिल्या टप्प्यातील घरांच्या प्रतीक्षेत असतानाच दुसऱ्या टप्प्यातील कामाविषयीचीसुद्धा माहिती जारी करण्यात आली. ज्यानुसार या टप्प्यात प्रत्यक्ष बांधकामाला मे महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे असून संक्रमण शिबिरे उपलब्ध नसल्यामुळे रहिवाशांनी घरभाडे घेत या प्रक्रियेत सहकार्य करावे असे आवाहन म्हाडाने केले.

सोयी-सुविधा दिल्या जाणार

बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प दोन टप्यांमध्ये पूर्व केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात ५१९८ रहिवाशांना हक्काच्या घरात जाण्याची संधी मिळाणार आहे. बरकीतील प्रकल्पासाठी तब्बल २२,९०१.२५ कोटी इतका खर्च करण्यात येत असून, प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तिथे रहिवाशांना संकुलाच्या परिघातच शाळा, रुग्णालये, रिक्रिएशनल स्पेस अशा सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -