अभिनेता किरण माने यांच्या वडिलांचं निधन

मुंबई : अभिनेते किरण माने यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. किरण माने यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. दिनकरराव माने असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं.८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


किरण माने यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले, "माझे नातेवाईक,मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या माहितीसाठी…माझे वडील दिनकरराव मारुती माने यांचे आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता संगम माहुली, सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत." या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.



माने यांच्या वडिलांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश झाला होता. एका मुलाखतीत किरण माने म्हणाले होते की, "आपल्याला मुलासाठी बघितलेली सर्व स्वप्न आज पूर्ण होत आहेत तरी तुम्ही समोर असूनही तुम्हाला ती अनुभवता येत नाहीत. कारण तुम्हाला काहीच आठवत नाहीये

Comments
Add Comment

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम