मुंबई : दादरच्या सेनापती बापट मार्गावर दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक टॅक्सी चालक आणि एक महिला यांचा समावेश आहे.
Mumbai Railway Megablock : प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेचा गुढी पाडव्याच्या दिवशी मेगाब्लॉक
हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवार २९ मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील एलफिन्स्टन पुलावर अपघात झाला. एका भरधाव एसयूव्ही कारने समोरुन टॅक्सीला धडक दिली. अपघातात टॅक्सीचा चुराडा झाला. टॅक्सी चालक आणि प्रवासी महिला यांचा मृत्यू झाला.
लोअर परळच्या एलफिन्स्टन पुलावर दुभाजक नाही. तसेच या परिसरात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. यामुळे या ठिकाणच्या वाहनांची संख्या खूप जास्त आहे. लाखो कर्मचारी या पुलाचा वापर करत असतात. पण आज शनिवार असल्याने नेहमीपेक्षा कमी वर्दळ होती. वाहने नेहमीच्या तुलनेत वेगाने जात होती. याचवेळी अपघात झाला. मोकळ्या रस्त्यावरुन वेगाने आलेल्या कार आणि टॅक्सीची धडक झाली.
कोकणात तीन अपघात
कोकणात तीन ठिकाणी अपघात झाले. एकाचा मृत्यू झाला आणि ३५ जण जखमी झाले. अलिबाग बायपास जवळ असेलल्या चर्चेजवळ मोटारसायकल आणि स्कुटीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे भागातील हॉटेल विरंगुळा येथे भरधाव कारची दुचाकीला धडक बसली. गोव्याच्या दिशेने जाणारी कार दुचाकीला धडक देत मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो पीक अप गाडीवर आदळली. अपघातामध्ये दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. यात तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ येथून पणजीकडे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटीत अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील 35 प्रवासी जखमी झाले. त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.