Sunday, May 11, 2025

विदेशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Balochistan : बलुचिस्तानमध्ये आयईडी स्फोट; आठ पाकिस्तानी सैनिक ठार आणि चार जखमी

Balochistan : बलुचिस्तानमध्ये आयईडी स्फोट; आठ पाकिस्तानी सैनिक ठार आणि चार जखमी
ग्वादर : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर शहरात शुक्रवार २८ मार्च २०२५ रोजी रमझान महिन्यातील अलविदा जुमाच्या दिवशी आयईडी स्फोट झाला. या स्फोटात पाकिस्तानचे आठ सैनिक ठार झाले आणि चार सैनिक जखमी झाले. अज्ञात हल्लेखोरांना पदीजर भागात मरिन ड्राईव्हवर असलेल्या जीपीए कार्यालयाच्या जवळ एका लष्करी वाहनाला लक्ष्य करुन आयईडीचा स्फोट केला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. पण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनेच हा हल्ला केल्याची शक्यता पाकिस्तानच्या लष्कराकडून व्यक्त करण्यात आली आहे.



याआधी बुधवार २६ मार्च २०२५ रोजी ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा राजमार्गावर एका बसमध्ये बसलेल्या सहा जणांना रस्त्यात उतरवून ठार करण्यात आले. ठार मारलेले सर्व प्रवासी पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे रहिवासी होते. हल्लेखोरांनी ओळखपत्र तपासून नंतर प्रवाशांना ठार केले.



पाकिस्तानच्या सैनिकांनी २२ मार्च रोजी मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या महरंग बलोच यांना अटक केली. या घटनेनंतर बलुचिस्तान प्रांत हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Comments
Add Comment