Friday, April 18, 2025
HomeदेशIndia Help Myanmar : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी सरसावला...

India Help Myanmar : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी सरसावला भारत

नवी दिल्ली : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी भारत सरसावला आहे. म्यानमारमध्ये भूकंपामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले असून २३७६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे १० मृत्यू झाले असून ६८ जण जखमी झाले आहेत. चीनमध्ये भूकंपामुळे दोन जण जखमी झाले आहेत. भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.

Mumbai Railway Megablock : प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेचा गुढी पाडव्याच्या दिवशी मेगाब्लॉक

भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमधील आपल्या दूतावासात हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून दोन्ही देशांतील भूकंप पीडित भारतीयांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.

Earthquake : म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे हाहाकार; अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त

भूकंपाचा सर्वाधिक फटका म्यानमारला बसला आहे. यामुळे भारत सरकारने तातडीने तंबू, अंथरुण – पांघरुण, स्लीपिग बॅग, अन्नाची पाकिटे, पाण्याची पाकिटे, वैयक्तिक स्वच्छतेसाठीची पाकिटे, जनरेटर, औषधे, वैद्यकीय साहित्य अशी विविध प्रकारची १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला पाठवली आहे.

भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावरुन सी १३० जे या मालवाहक विमानातून १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला रवाना झाली. ही मदत म्यानमारमध्ये पोहोचली आहे. या व्यतिरिक्त भारतीय नौदलाच्या जहाजांमधून ४० टन मदत म्यानमारला पाठवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -