Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीKunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल

Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल

मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादाचे चित्र निर्माण झाले होते. शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थकांकडून कुणाल कामराच्या स्टुडीओची देखील तोडफोड करण्यात आली होती. अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यातच आता कामराच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास!

विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मनमाड, नाशिक येथील मयूर बोरसे; जळगाव जामोद, बुलढाणा येथील संजय भुजबळ; आणि नांदगाव मनमाड, नाशिक येथील सुनील जाधव या शिवसेनेच्या सदस्यांनी कामरा विरोधात तीन नवीन एफआयआर दाखल केले आहेत. ‘कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नैतिक वर्तनाची बदनामी अपमानास्पद विधाने करून दोन्ही राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केला’ असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली नवीन एफआयआर देखील नोंदवण्यात आले आहेत, ज्यात ३५३(१)(ब), ३५३(२) (सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान) आणि ३५६(२) (बदनामी) यांचा समावेश आहे. खार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा बोलावले आहे पण तो अद्याप हजर झालेला नाही. यानंतर, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ३१ मार्च रोजी समन्स बजावले आहे.

वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही – कुणाल कामरा

कुणाल कामरा याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत. नंतर, त्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकार आणि मंत्र्यांवर टीका करणारे आणखी व्हिडिओ देखील शेअर केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -