Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL 2025: साई सुदर्शनची धमाकेदार खेळी, गुजरातचे मुंबईला इतक्या धावांचे आव्हान

IPL 2025: साई सुदर्शनची धमाकेदार खेळी, गुजरातचे मुंबईला इतक्या धावांचे आव्हान

मुंबई: गुजरातच्या अहमदाबादच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या आयपीएल २०२५च्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १९६ धावा केल्यात.

सलामीवीर साई सुदर्शनचे अर्धशतक, त्यानंतर शुभमन गिल आणि जोस बटलरच्या प्रत्येकी ३८ आणि ३९ धावा यांच्या जोरावर गुजरातने २००च्या जवळपासचा आकडा गाठला. त्यांची सुरूवात दमदार झाली. गिल आणि सुदर्शन यांची भागीदारी चांगली जमली होती.

गुजरात टायटन्सची सुरुवात दमदार झाली. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शनने मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. पहिल्या ६ षटकांत गुजरातने ६६ धावा केल्या होत्या. मुंबईला पहिले यश हार्दिक पांड्याने मिळवून दिले. त्याने गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला बाद केले.

शुभमनने २७ बॉलमध्ये ३८ धावा केल्या. यात चार चौकारांशिवाय एका षटकाराचा समावेश होता. शुभमन आणि सुदर्शन यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. गिल बाद झाल्यानंतर बटलर क्रीझवर उतरला आणि त्याने सुदर्शनसह मिळून दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावा केल्या.

जोस बटलरने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ बॉलमध्ये ३९ धावा केल्या. बटलरला स्पिनर मुजीर उऱ रहमानने बाद केले. बटलर बाद झाल्यानंतर सुदर्शनने अर्धशतक पूर्ण केले. सुदर्शनने पंजाब किंग्सविरुद्धही अर्धशतकी खेळी केली. यातच गुजरात टायटन्सने शाहरूख खानला स्वस्तात गमावले. येथून गुजरातने तीन बॉलवर तीन विकेट गमावले. शेवटच्या षटकांमध्ये सातत्याने विकेट पडल्याने गुजरातला २००चा आकडा गाठता आला नाही.

Comments
Add Comment