Thursday, April 17, 2025
Homeताज्या घडामोडीमुलुंड डम्पिंग ग्राऊडवरील विल्हेवाटचे काम संथ गतीने सुरु

मुलुंड डम्पिंग ग्राऊडवरील विल्हेवाटचे काम संथ गतीने सुरु

जूनपर्यंत प्राप्त होणार २५ एकरच जागा मोकळी

मुंबई : मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे जमीन पुनः प्राप्त करण्यासाठी मुलुंड क्षेपणभूमी येथे जून २०२५ पर्यंत ७० लाख मेट्रीक टन इतक्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावून क्षेपणभूमीची २४ हेक्टर जमीन पुनःप्राप्त करण्याकरिता महानगरपालिकेने प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु जून २०२५ पर्यंत केवळ १० हेक्टरच अर्थात २५ एकर एवढीच जागा मोकळी करून दिली जाणार आहे.

मुंबईतील मुलुंड डम्पिग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून ते जमिनसपाटीला आणण्याच्या कामाला सन २०१८ मध्ये सुरुवात झाली. हे काम पुढील सहा वर्षांमध्ये पूर्ण होऊन डम्पिंग ग्राऊंडची जागा पूर्णपणे प्राप्त व्हायला हवी होती, परंतु यासाठी नेमलेल्या कंपनीकडून कचरा विल्हेवाटीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. आतापर्यंत याठिकाणी असलेल्या ७० लाख मेट्रीक टनाची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते, पण २८ मार्च २०२५ पर्यंत एकूण ५५ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात यश आले आहे.

BMC : मुंबईत कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी देवनारमध्ये नवीन सी अँड डी प्लांट उभारणार

मागील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ४०.९३ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १८.३७ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याचे नियोजित होते. परंतु आतापर्यंत एकूण ५५ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांत १०.७० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित मानले जात असतानाच तब्बल १८ लाख मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे बाकी असल्याचीही माहिती मिळत आहे.

मुंबई पालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या या प्रकल्पाचे काम जून २०२५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु जून २०२५ पर्यंत २४ हेक्टर पैंकी केवळ १०.१२ हेक्टर जमिनच पुनर्प्राप्त होणार आहे. त्यामुळे एकूण ५० एकर पैंकी जून २०२५ पर्यंत केवळ २५ एकरच जागा प्राप्त होणार असल्याची महिती मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -