Thursday, April 10, 2025
Homeताज्या घडामोडीडमी शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर सीबीएसई घालणार आळा

डमी शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर सीबीएसई घालणार आळा

नवी दिल्ली : अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. आता या विद्यार्थ्यांना आणि डमी शाळांना आळा घालण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पाऊल उचलले आहे. अशा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेत बसू देणार नाही. यासंबंधीच्या नियमाची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचे समजते. डमी शाळांवर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. या नियमामुळे परीक्षेला मुकलेले विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (एनआयओएस)द्वारे आयोजित परीक्षा देऊ शकतील.

IPL 2025: तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने चेन्नईला चेपॉकमध्ये हरवले, मिळवला ५० धावांनी विजय

सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीएसईच्या पथकाद्वारे संलग्नित शाळांची अचानक तपासणी केली जाते. या तपासणीवेळी विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळले. तसेच विद्यार्थांची ही गैरहजेरी सततची असेल, तर बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसू दिले जाणार नाही. या संबंधीच्या उपनियमांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल केले जाण्याची तयारी सुरू आहे. नियमित शाळेत न गेल्यामुळे परीक्षेला बसता आले नाही. तर जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर आणि त्याच्या पालकांवर असेल. सीबीएसईच्या नुकत्याच झालेल्या गव्हर्निंग बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीत हा निर्णय शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ पासून लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे समजते. महाराष्ट्रात यापुढे जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याची राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -