Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Maharashtra School : शालेय विद्यांर्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार

Maharashtra School : शालेय विद्यांर्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाका प्रचंड वाढला आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळा व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी (माध्यमिक व उच्च माध्यमिक) आणि शिक्षण संचालक शरद गोसावी (प्राथमिक) यांनी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.१५ आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी ७ ते ११.४५ अशी वेळ निश्चित केली आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद यांच्या शिक्षणाधिकारी व शिक्षण प्रमुखांना हे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल, असेही सूचित करण्यात आले आहे. मात्र स्थानिक परिस्थिती नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनेच जर काही बदल करायचा असल्यास तो करता येइल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >