Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Crime : पुण्यातील तरुणीची बंगळुरूत हत्या; तुकडे करुन बॅगेत भरले

Crime : पुण्यातील तरुणीची बंगळुरूत हत्या; तुकडे करुन बॅगेत भरले
पुणे : महाराष्ट्रातील पुणे आणि कर्नाटकमधील बंगळुरू ही दोन्ही शहरे आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक मराठी - अमराठी तरुणी तरुणी या दोन्ही शहरांमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातून आणि बंगळुरूतून अनेकदा आयटी क्षेत्राशी संबंधित आनंदवार्ता तसेच बड्या कंपन्यांच्या विविध घोषणांच्या बातम्या येत असतात. पण यावेळी पुणे आणि बंगळुरू ही दोन्ही शहरे भलत्याच कारणामुळे चर्चेत आहेत.
पुण्याची गौरी राकेश खेडेकर पती राकेश राजेंद्र खेडेकर सोबत बंगळुरूत वास्तव्यास होती. गौरी आणि राकेश बंगळुरूत स्थायिक होऊन जेमतेम महिना उलटला होता. तोच बंगळुरूतून एक धक्कादायक बातमी आली. राकेशने गौरीची हत्या केली. हत्या केल्यानंतर राकेशने गौरीच्या शरीराचे छोटे तुकडे केले आणि ते बॅगेत भरले. बॅग घरात ठेवून राकेशने घर मालकाला फोन केला आणि स्वतःच घटनेची माहिती दिली. फोन कट केल्यानंतर राकेश फरार झाला. हत्येची माहिती मिळताच घर मालकाने तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी राकेशचे घर गाठले. घर मालकाच्या चावीने दरवाजा उघडून पोलीस घरात गेले. तिथे बॅगेत गौरीच्या शरीराचे तुकडे बघून पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवला.
फरार झालेला राकेश पुण्यातल्या घरी पोहोचला. पुण्यातल्या घरी आल्यावर राकेशने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण राकेशला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार केल्यामुळे राकेश वाचला. तोपर्यंत बंगळुरू पोलिसांचे पथक राकेशचा शोध घेत पुण्यात पोहोचले होते. पोलिसांकडून राकेशच्या कृत्याची माहिती मिळताच त्याच्या नातलगांना जबर धक्का बसला. बंगळुरू पोलिसांनी पुणे पोलिसांना आणि राकेशच्या नातलगांना सर्व माहिती दिली आहे. आता तब्येत सुधारल्यावर डॉक्टरांच्या परवानगी बंगळुरू पोलीस राकेशचा ताबा घेणार आहेत. गौरीच्या हत्येप्रकरणी आधी राकेशची चौकशी होईल. नंतर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
हाती आलेल्या वृत्तानुसार, पुण्यात पोहोचल्यानंतर राकेशने झुरळ मारण्याचे औषध आणि फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >