Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाबीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल ?

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये होणार बदल ?

मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड भारताच्या पुरूष क्रिकेट संघासाठी लवकरच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा करणार आहे. यासाठी आयपीएल २०२५ च्या दरम्यान येत्या २९ मार्चला मिटिंगही घेण्यात येणार आहे.या दरम्यान सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबरोबरच अनेक निर्णयही घेतले जाणार आहेत. पण यापूर्वी रोहित-विराट-जडेजा यांच्याबद्दल एक अपडेट देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,निवडकर्ते केंद्रीय करारामध्ये अनेक बदल करू शकतात. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांची गुवाहाटी येथे २९ मार्च रोजी बैठक होणार असून जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या संभाव्य संघावर चर्चा होणार आहे. या बैठकीत पुरूष संघाच्या केंद्रीय करारालाही अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर करण्याआधीच कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचं डिमोशन होऊ शकतं असं म्हटलं आहे. याशिवाय, पहिल्यांदाच काही नवीन खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

भारतातील काही दिग्गज स्टार्सच्या भविष्यावर निवड समिती चर्चा करणार आहे. त्यात कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यासाठी संकेत देण्यात आले होते. रोहित, कोहली आणि जडेजा सध्या A+ श्रेणीत आहेत, जे केंद्रीय करारांमध्ये अव्वल आहे. ही श्रेणी सर्वसाधारणपणे सर्व फॉरमॅटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंसाठी राखीव आहे. पण रोहित, कोहली आणि जडेजा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना A+ श्रेणीतून A श्रेणीत ठेवले जाईल. रोहित शर्माची कर्णधारपदासाठी निवड करण्याबाबत कोणतेही एकमत झालेले नाही. रोहितची वनडेमधील कामगिरी पाहता बीसीसीआय काय निर्णय घेणार यावर सर्वांचं लक्ष असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त जसप्रीत बुमराह A+ श्रेणीत कायम राहू शकतो. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल (A श्रेणी) याला सर्वोच्च श्रेणीत बढती मिळू शकते. तर यशस्वी जैस्वाल (ब श्रेणी) अ श्रेणीत जाऊ शकतो. आणखी एक खेळाडू ज्याला ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती मिळू शकते तो म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेल आहे. तर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर झालेल्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना पुन्हा संधी मिळेल.नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अभिषेक शर्मा यांचा प्रथमच केंद्रीय करारात समावेश केला जाऊ शकतो, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी C श्रेणीमध्ये स्थान दिले जाऊ शकते, ज्यासाठी क्रिकेटपटूने किमान ३ कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -