
कणकवली : नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथीयाकडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथीयाला हुमरठ येथे पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. तर तृतीयपंथीयाच्या दुसऱ्या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव येथे पकडून ठेवले. ही घटना गुरूवारी (दि.२७) दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. यावेळी युवतीवर जादूटोणा केल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते. तृतीय पंथीय व्यक्तीने नांदगाव येथे फिरत असताना युवतीला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि आपल्या मोहिणीच्या जाळ्यात अडकवून त्या युवतीला वाहनातून कणकवलीच्या दिशेने घेऊन गेली. यावेळी त्याने जादूटोणा केल्याचा प्रयत्न केला. त्याला युवतीही प्रतिसाद देऊ लागली.
/>
मात्र, याची स्थानिक ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तृतीयपंथीयाला पकडले. तर दुसऱ्या तृतीय पंथीयाला युवतीसह मुंबई - गोवा महामार्गावरील हुमरठ येथे ताब्यात घेतले. तृतीय पंथीयाला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर युवतीला रूग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.