
मुंबई : वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. याला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रानुसार तसेच धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व खूप आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रहणाच्या दरम्यान राहू-केतूचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते.
/>
या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी दुपारी २:२१ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६:१४ वाजता संपेल. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे सुतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे भारतातील नागरिकांनी हे सूर्यग्रहण पाळू नये.
या वर्षातील पहिले आंशिक सूर्यग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर, बार्बाडोस, बेल्जियम, उत्तर ब्राझील, बर्म्युडा, फिनलंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, ग्रीनलँड, हॉलंड, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, उत्तर रशिया, स्पेन, मोरोक्को, युक्रेन, उत्तर अमेरिकेचे पूर्वेकडील प्रदेश, इंग्लंड इत्यादी ठिकाणी दिसेल.