

Crime : पुण्यातील तरुणीची बंगळुरूत हत्या; तुकडे करुन बॅगेत भरले
पुणे : महाराष्ट्रातील पुणे आणि कर्नाटकमधील बंगळुरू ही दोन्ही शहरे आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक मराठी - अमराठी तरुणी तरुणी या दोन्ही शहरांमध्ये ...
आवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीला विरोध केल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. पण या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबातील सुग्रीव कराड कोण आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने आणखी दोन ...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचे आतापर्यंत सर्व समजत होते. पण चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबात सुग्रीव कराड हे वेगळेच नाव पुढे आले आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन सरपंच संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. त्याचा बदला म्हणून घुले आणि त्याच्या साथीदारांनी देशमुख यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना सांगितले. चाटे आणि केदार यांच्या जबाबात खंडणीचा उल्लेख कुठेही आलेला नाही.

Earthquake : म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे हाहाकार; अनेक गगनचुंबी इमारती जमीनदोस्त
म्यानमार : म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवार २८ मार्च रोजी सकाळी भूकंप झाला. भूगर्भतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये ७.९ रिश्टर आणि ...
आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती. सरपंच देशमुख आणि ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन घुलेला मारहाण केली. या प्रकारामुळे घुले आणि वाल्मिक अण्णा कराडचा अपमान झाल्याचे फरार आरोपी कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितले. घुले आणि वाल्मिक अण्णा कराडच्या अपमानाचा बदला घ्यावा लागेल, असे आंधळे आम्हाला म्हणाला होता; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.
घुलेला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या जबाबामुळे या प्रकरणात सुग्रीव कराड हे नवे नाव पुढे आले आहे. आता हा सुग्रीव कराड असा प्रश्न निर्माण झाला आहे.