Friday, April 25, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईतील संभाव्य प्रदूषणाची माहिती आगावू मिळवणार महापालिका

मुंबईतील संभाव्य प्रदूषणाची माहिती आगावू मिळवणार महापालिका

तातडीने उपाययोजना करण्यासाठी बसवली जाणार आगावू सूचना यंत्रणा

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील संभाव्य प्रदूषणकारी घटनांवरती तातडीचे उपाय सुचविणारी अशी आगाऊ सूचना मंत्रणा आता मुंबई महानगरपालिकेच्यावतीने बसवली जाणार आहे. हवेच्या शुध्दत्तेसाठी एक डायनेमिक मॉडलिंग सिस्टिम तयार करुन घेण्यात येत असून या यंत्रणेमुळे हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून व त्याचे नियोजन करता येणार आहे. या यंत्रणेद्वारे मुंबई शहरात संभाव्य हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी स्त्रोतांच्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांकरता मेट्रो इत्यादी बरीचशी पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. तसेब वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहरात पीएम २.५ व पी.एम. १० प्रतीच्या धुळीचे प्रमाण वाहले आहे. साधारण वातावरणात पश्चिमी वा-यांमुळे शहरातील धूळ मिश्रीत धुके समुद्राकडे वाहत जाते. परंतु वातावरण बदलामुळे प्रामुख्याने हिवाळ्यात वाहत्या वा-याचा प्रवाह कमी झाल्यामुळे मोठया प्रमाणातील प्रदूषिफा चुके मुंबई शहरावरच आच्छादून राहते आणि असे प्रदूषण आरोग्यास घातक असते.

मुंबईतील हवेच्या खालावलेल्या प्रतीमुळे मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांची कसून निरीक्षणे उच्च न्यायालयाने नोंदवली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (म.प्र.नि.नं.), भारतीय उष्णदेशीष मौसम विज्ञान संस्थान (IITM) व मुंबई महानगरपालिका यांनी मुंबईत बसविलेल्या हवा गुणवत्ता केंद्रांमधील निष्कर्षांनुसार मुख्यतः हिवाळ्यात मुंबईची गुणवत्ता मध्यग ते खराब दर्शवते. प्रदूषणावर पुरेपूर उपाय करुन जेथे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होते, तेथे सुधारित वातावरणासाठी पुरेसे उपाय करणे जरुरीचे असल्याचेही न्यायालयाने नमुद केले होते.

मुंबईसारखीच दिल्ली शहरात वायूप्रदुषणाची समस्या भेडसावत असल्याने पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, भारतीय हवामान विभाग व भारतीय मध्यम अवधी हवामान पुर्वानुमान केंद्र यांनी एकत्रपणे उच्च रिझोल्यूशन हवा गुणवत्ता प्रणाली ही दिल्ली एनसीआर विभागासाठी तयार केली आहे. ही प्रणाली हवामानाचा अंदाज, प्रदूषण हे लो कॉस्ट सेन्सरच्या डेटावर आधारीत पुढील सात दिवसांसाठी हवेच्या गुणवत्तेबाबत आगावू सूचना देते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -