इंग्लंड : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील केलॉग महाविद्यालयात विशेष कार्यक्रमात भाषण करण्यासाठी उपस्थित होत्या. ममता बॅनर्जी यांचे भाषण सुरू होताच काही नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि भाषणात वारंवार व्यत्यय आणला. ममता बॅनर्जी परत जा अशा स्वरुपाच्या घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या. घोषणा देणाऱ्यांनी ते मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सुरू असलेला अन्याय आणि मुसलमानांचे वाढते लांगुलचालन याचा निषेध म्हणून ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी परत जा अशा घोषणा दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.
CM @MamataOfficial heckled during her Oxford speech, unidentified person questions her about Hindus in #Bengal
Banerjee responds saying, “I am for all, I am for Hindu, Muslim Sikh Isai, I am for unity and you people are not!” pic.twitter.com/uKf1rMZBON
— Indrajit Kundu | ইন্দ্রজিৎ (@iindrojit) March 27, 2025
ममता बॅनर्जी विरोधक ते सत्ताधारी हा प्रवास कसा केला याविषयी सांगत होत्या. हे भाषण सुरू असतानाच पश्चिम बंगालमधील गुंतवणूक या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देण्याआधीच पश्चिम बंगालमधील आर. जी. कार रुग्णालयातील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत काय झाले आहे आणि पीडितेला न्याय कधी मिळणार ? अशा स्वरुपाचे प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली. लागोपाठ आलेल्या या प्रश्नांमुळे संतापलेल्या ममता बॅनर्जींनी प्रश्न विचारणाऱ्यांना कोणता राजकीय अजेंडा पुढे करण्यासाठी प्रश्न विचारत आहात, असा प्रतिप्रश्न केला. विरोधक होते त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर हल्ले केले. या हल्ल्यांतून तावून सुलाखून बाहेर पडले आणि सत्ता काबीज केली. प्रश्न विचारणाऱ्यांनी आणि ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या लोकांनी आधी स्वतःची राजकीय स्थिती भक्कम करावी नंतर प्रश्न विचारावे असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य आले त्याच सुमारास परत जा अशी घोषणाबाजी सुरू झाली. ममता बॅनर्जी परत जा या घोषणा देत वारंवार भाषणात व्यत्यय आणण्यास सुरुवात झाली.
Bengali Hindus confront West Bengal Chief Minister Mamata Banerjee at Kellogg College in London, raising angry slogans calling her out for the rape and murder of the lady doctor at RG Kar, crimes against women in Sandeshkhali, the genocide of Hindus, and widespread corruption… pic.twitter.com/eT6JlOWYyZ
— Amit Malviya (@amitmalviya) March 27, 2025
घोषणाबाजी सुरू होती त्यावेळी केलॉग महाविद्यालयातील कार्यक्रमात प्रेक्षकांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली उपस्थित होता. पण गांगुलीने हस्तक्षेप करुन मुख्यमंत्री अथवा आंदोलक यापैकी कोणाच्याही बाजूने बोलणे टाळले. भाषणात व्यत्यय आणण्यास सुरुवात झाल्यावर आणखी संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी मी कोणत्याही एका जातीची अथवा धर्माची बाजू कधी घेतली नाही आणि घेणार नाही, असे सांगितले. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करत असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.