Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाIPL 2025Kl Rahul : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल करणार कमबॅक

Kl Rahul : सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल करणार कमबॅक

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ मध्ये त्यांच्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. त्यांनी सोमवारी पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अवघ्या १ विकेटने रोमांचक विजय मिळवला. तथापि, सामन्यात डीसीसाठी केएल राहुलची मोठी उणीव भासली. तो या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. दिल्लीच्या पहिल्या सामन्याच्या दिवशी राहुलची पत्नी आथिया शेट्टीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यासाठी संघ व्यवस्थापनाने राहुलला पहिला सामना न खेळण्यास विशेष परवानगी दिली होती.

राहुल हा डीसी लाइनअपमधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, त्याला आयपीएल २०२५च्या लिलावात १४ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. राहुलचे आयपीएलमध्ये कधी पुनरागमन होईल, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अखेर त्याच्या परतीची तारीख समोर आली आहे. ज्यामुळे डीसी चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Lionel Messi : मेस्सी आणि त्याचा संघ १४ वर्षाने पुन्हा भारतात खेळणार!

केएल राहुल रविवारी, ३० मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सच्या दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरेल. ही लढत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. राहुल आयपीएल २०२४ पासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्याला २०२४ च्या टी-२० विश्वचषक संघातही स्थान मिळवता आले नाही. पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर मिळालेल्या वेळेचा पुरेपूर वापर केला आहे. तो टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली मुंबईत सराव केला.

आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी हैदराबाद संघाने १३ सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स ११ लढतींमध्ये विजय मिळवला आहे. विशाखापट्टणम स्टेडियमवर आतापर्यंत त्यांच्यात एकही सामना झालेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -