Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Jioचा सर्वात स्वस्त प्लान, मिळणार ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि बरंच काही...

Jioचा सर्वात स्वस्त प्लान, मिळणार ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी आणि बरंच काही...

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्जचे पर्याय मिळतात. कंपनी काही स्वस्त प्लान्सही ऑफर करते यामुळे अनेकांचे पैसे वाचू शकतात. आम्ही बोलत आहोत १७४८ रूपयांच्या जिओच्या रिचार्ज प्लानबद्दल... हा प्लान केवळ कमी किंमतीलाच नाही तर यात तुम्हाला अनेक फायदेही मिळतील.


जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे मिळतात. कंपनी यात तुम्हाला डेटा ऑफर करत नाही. सोबतच अतिरिक्त फायदेही मिळतात.


जिओचा हा प्लान ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच ११ महिन्यांच्या व्हॅलिडिटीसाठी कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. कंपनी यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण ३६०० एसएमएस संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी ऑफर करते. यात तुम्हाला डेटा मिळत नाही.


हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे डेटाशिवाय केवळ कॉलिंग आणि एसएमएसचा प्लान हवा आहे. यात तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतील.


कंपनी जिओ टीव्हीचा अॅक्सेसही देत आहे. सोबतच तुम्हाला जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल. यात तुम्ही ५० जीबी डेटा स्टोर करू शकता. व्हॅल्यू पॅकमध्ये ४४८ रूपयांचे कॉलिंग प्लान येतो. यात तुम्हाला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी प्लानवरील सर्व सुविधा मिळतील.


कंपनी १८९ रूपयांचा प्लानही ऑफर करते. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. सोबतच तुम्हाला कॉलिंग, एसएमएससोबत २ जीबी डेटाही मिळतो.

Comments
Add Comment