Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025: तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने चेन्नईला चेपॉकमध्ये हरवले, मिळवला ५० धावांनी...

IPL 2025: तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने चेन्नईला चेपॉकमध्ये हरवले, मिळवला ५० धावांनी विजय

चेपॉक: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ८व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सला ५० धावांनी हरवले. आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ ८ बाद १४६ धावाच करता आल्या. ५० धावांनी आरसीबीने हा सामना जिंकला आहे.

तब्बल ६१५५ दिवसांनी आरसीबीने चेन्नईला चेन्नईच्या मैदानात हरवून दाखवले. २००८मध्ये पहिल्यांदा आरबीसीने चेन्नईला त्यांच्याच मैदानात हरवले होते. त्यानंतर आरसीबीला चेन्नईला हरवण्यासाठी १७ वर्षे वाट पाहायला लागली.चेन्नईने याआधी पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चार विकेटनी हरवले होते. तर दुसरीकडे आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सला सात विकेटनी पराभूत केले होते.

आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खराब राहिली. सीएसकेने पावरप्लेमध्ये तीन विकेट गमावले. आधी जोश हेझलवूडने दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने तिसरी विकेट घेतली. त्यानंतर सॅम करन ८ धावा करून परतला. यावेळी चेन्नईची धावसंख्या ४ बाद ५२ इतकी होती.

यानंतर यश दयालने सीएसकेलेला दोन मोठे झटके दिले. दयालने सेट झालेल्या रचिन रवींद्रला बोल्ड केले. त्यानंतर शिवम दुबेला बाद केले. रवींद्रने ५ चौकाराच्या मदतीने सर्वाधिक ३१ बॉलवर ४१ धावा केल्या. तर शिवम दुबेने दोन चौकार आणि एक सिक्सच्या मदतीने १९ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, आरसीबीने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना सात बाद १९६ धावा केल्या होत्या.बंगळुरूकडून कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ५१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ३१ धावांची खेळी केली. सलामीवीर फिल सॉल्टने ३२ धावा केल्या. देवदत्त पड्डिकलने २७ धावा ठोकल्या. टीम डेविड जबरदस्त खेळला. त्याने ८ बॉलमध्ये २२ धावा तडकावल्या. शेवटच्या षटकांत डेविडने ३ षटकार ठोकले. त्यामुळे बंगळुरूला ही मोठी धावसंख्या गाठता आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -