Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीZojila Tunnel : भारतात साकारतोय आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा ‘झोजिला’ बोगदा

Zojila Tunnel : भारतात साकारतोय आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा ‘झोजिला’ बोगदा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुमारे सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या झोजिला बोगद्याचे काम सुरू आहे. हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. शून्याखाली तापमान येणाऱ्या भागात हा बोगदा उभारला जात आहे.

IPL 2025: लखनऊने हैदराबादला ५ विकेटनी हरवले, मार्श-पूरनचा कहर

लडाख, जम्मू आणि काश्मीर येथे हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असते. बर्फवृष्टीमुळे अनेकदा या भागाचा उर्वरित देशाशी संपर्क तुटतो. त्यामुळेच लडाखला देशाच्या इतर भागांशी सर्व ऋतूंमध्ये जोडणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. बोगदा आता केवळ ५५०० कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

३ तासांचा प्रवास २० मिनिटांत

गडकरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही या अत्याधुनिक प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आमंत्रित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये या बोगद्याची पायाभरणी केली होती. ७.५७ मीटर उंचीचा हा घोड्याच्या नालाच्या आकाराचा, दोन-लेन असलेला सिंगल-ट्यूब बोगदा आहे. तो हिमालयात झोजिला खिंडीखाली काश्मीरमधील गांदरबल आणि लडाखमधील द्रास (कारगील) जिल्ह्याला जोडेल. सध्या झोजिला खिंड पार करण्यासाठी सुमारे तीन तास लागतात, मात्र हा बोगदा पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ फक्त २० मिनिटांवर येईल. गडकरी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच १०५ बोगद्यांचे बांधकाम सुरू आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -