Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीDisha Salian Medical Report : शवविच्छेदन अहवालावरून राजकारण तापणार!

Disha Salian Medical Report : शवविच्छेदन अहवालावरून राजकारण तापणार!

अहवाल खोटा असल्याचा सालियन यांच्या वकिलाचा आरोप

मुंबई : दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल बाहेर आल्याची चर्चा सर्वत्र जोर धरत असून दिशा सालियनच्या वडिलांनी नियुक्त केलेल्या वकिलाने हा शवविच्छेदन अहवाल मान्य करण्यास नकार दिला आहे. हा अहवाल खोटा असल्याचा आरोप सालियन यांच्या वकिलाने केला आहे. या शवविच्छेदन अहवालात दिशा सालियन हिचा मृतदेह इमारतीपासून अंतरावर पडलेला असल्याचे आढळून आले. दिशाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तिच्या हातावर, पायावर आणि छातीजवळ जखमा झाल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. दिशाच्या नाकातोंडातून रक्त आले, मात्र दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता आणखी राजकारण तापणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Zojila Tunnel : भारतात साकारतोय आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा ‘झोजिला’ बोगदा

दिशा सालियन हिचा मृत्यू २०२० मध्ये झाला. त्यानंतर तिच्या मृत्यूवरून राजकारण संपलेले नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. आता हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांनी नवीन तक्रारीसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ही तक्रारच एफआयआर असल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये डिनो मोरियो, सुरज पांचाली, आदित्य ठाकरे यांच्यासह अंगरक्षक आणि इतरांना आरोपी करण्याची मागणी केली. त्यातच सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी शवविच्छेदनाबाबत एक मोठी मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -