Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Chhaava : बॉक्स ऑफिसवर अजूनही 'छावा'चे तुफान! लवकरच भरणार ६०० कोटींचा गल्ला

Chhaava : बॉक्स ऑफिसवर अजूनही 'छावा'चे तुफान! लवकरच भरणार ६०० कोटींचा गल्ला

मुंबई : दिड महिन्यांपूर्वी विकी कौशलचा (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आधारित 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. विकी कौशलच्या 'छावा' ने अद्भुत कामगिरी केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू होऊन जवळजवळ दीड महिना झाला आहे आणि अजूनही चित्रपट  पाहण्यासाठी सिनेप्रेमींची मोठी रांग लागली आहे. दरम्यान या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत. आता लवकरच या चित्रपटाचा गल्ला तब्बल ६०० कोटींपर्यंत भरणार असल्याची माहिती मिळत आहे. (Chhaava Box Office Collection)


/>

चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी आणि पाचव्या आठवड्यात ३३.३५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने ३६व्या दिवशी २.१ कोटी रुपये, ३७ व्या दिवशी ३.६५ कोटी रुपये, ३८ व्या दिवशी ४.६५ कोटी रुपये, ३९ व्या दिवशी १.६ कोटी रुपये, ४० व्या दिवशी १.५ कोटी रुपये आणि ४१ व्या दिवशी १.४ कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाच्या ४२ व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.


दरम्यान, 'छावा' सध्या ६०० कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मात्र याचवेळी सलमान खानचा सिकंदर येत्या ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा (Salman Khan) मोठा चाहता वर्ग आणि सिकंदरची लोकप्रियता पाहता त्याला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. त्यामुळे सिकंदरच्या (Sikandar) प्रदर्शनाचा 'छावा'वर काही फरक पडणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Comments
Add Comment