
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे धक्कादायक घटना घडली आहे. ४ मुलानंतर मुलगी नाही म्हणून दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय मुलीला सावत्र आई वडिलांनी मारहाण करुन तिचे हात-पाय मोडेपर्यंत तिला मारहाण करत तिची हत्या केली. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

वाडा : तालुक्यात ७० टायर कंपन्यांनी आपले जाळे पसरवले आहे. बहुसंख्य कंपन्या या शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे उघड झाले आहे. यातील ५२ टायर ...
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे राहणाऱ्या फौजिया शेख फईम आणि शेख आयुब फईम या नराधम आई वडिलांनी ४ मुलांनंतरही मुलगी होत नसल्याने एका चार वर्षीय मुलीला जालना येथून ५ हजाराला दत्तक घेतले होते. पतीच्या या निर्णयाला पत्नीचा विरोध होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडायला लागले होते. दोघांमधील वादाचं कारण ठरत असलेल्या चिमुरडीला दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या दांपत्याने त्या चिमुरडीचा अमानुष छळ सुरू केला. नराधम आई वडील तिला उपाशी ठेवायचे. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर दोघांनी चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत वजनदार वस्तूने जोरात वार करुन तिला गंभीर जखमी करण्यात आलं. विव्हळत असलेल्या चिमुकलीने अखेर बुधवारी (दि २६) मध्यरात्री तीन वाजता प्राण सोडले. या नराधम आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.