ओपनएआयच्या जीपीटी-४ ने त्यांच्या जीपीटी-४ओ मॉडेलमध्ये एक नवीन नेटिव्ह इमेज क्रिएशन फीचर सादर केले आहे . ज्यामुळे सोशल मीडियावर घिबली-शैलीतील पोर्ट्रेटचा व्हायरल ट्रेंड सुरू झाला. आपल्यापैकी अनेकांना अॅनिमेटेड चित्रपट पाहायला आवडत असतील. कारण अॅनिमे कॅरेक्टर्स हे दिसायला कार्टून सारखे असले तरी ते प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करतात. शिवाय ते दिसायला देखील फार युनिक असतात. पण विचार करा तुम्हाला देखील या अॅनिमे जगाचा पार्ट होण्याची संधी मिळाली तर? होय, अॅनिमे लव्हर्सची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी चॅट जीपीटीनं एक नवं फिचर अपडेट केलं आहे. Ghibli आर्ट असं या फीचरचं नाव आहे.
Ghibli फिचरच्या मदतीने तुम्ही सुद्धा आपले फोटो अॅनिमे स्टाईलमध्ये कनव्हर्ट करू शकता. चॅट जीपीटीनं आपल्या GPT-४० या नव्या मॉडेलमध्ये एक इमेज जनरेटरचं फिचर दिलं आहे. या फिचरच्या मदतीनं तुम्ही स्वत:चे फोटो किंवा तुम्हाला हवे ते फोटो तुम्ही अॅनिमे स्टाईलमध्ये तयार करू शकता. सध्या सोशल मीडियावर या Ghibli फिचरचा प्रचंड वापर केला जातोय. सोशल मीडियावर जणू नवाच ट्रेंड आलाय असं म्हणायला हरकत नाही. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील हा फिचर वापरून आपले फोटो पोस्ट केले आहेत.
Ok I think I’m in love with ChatGPT’s new image editing feature.
Can turn all my family photos into Ghibli portraits. pic.twitter.com/tZCbxPUA0D
— Peter Yang (@petergyang) March 26, 2025
मुख्यमंत्री फडणवीसांचा घिबली स्टाईल एन्ट्री
राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील हा घिबली स्टाईल फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान मोदींना सदिच्छा भेट देत असतानाच फोटो घिबली स्टाईलमध्ये पोस्ट केला आहे. आणि त्यावर लिहिलंय की, ही माझी घिबली स्टाईल एन्ट्री आहे. ‘तंत्रज्ञान आपल्याला आनंदी होण्यापासून रोखत नाही’.
That’s my #ghibli style entry 😀
Technology just doesn’t stop surprising us pleasantly ! @narendramodi @fadnavis_amruta pic.twitter.com/r2vTqj61vO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2025
घिबली म्हणजे काय?
“स्टुडिओ घिबली हा एक प्रसिद्ध जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे, जो सुंदर रचलेला, कल्पनारम्य आणि भावनिकदृष्ट्या प्रतिध्वनीत चित्रपट तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची स्थापना १९८५ मध्ये अॅनिमेशनच्या जगातले दोन प्रभावशाली दिग्दर्शक हयाओ मियाझाकी आणि इसाओ ताकाहाता यांनी केली होती. स्टुडिओ त्याच्या अद्भुत कलाकृती, खोल कथाकथन आणि निसर्ग, मानवता, कल्पनारम्य आणि आत्म-शोधाच्या थीमसाठी व्यापकपणे ओळखला जातो.”