Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईतल्या 'त्या' ६२ हजार महिलांना मिळणार शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र

मुंबईतल्या ‘त्या’ ६२ हजार महिलांना मिळणार शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने गरीब आणि गरजू महिलांसाठी तसेच पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक महिलांसाठी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र वाटपाचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत ६७,१०० महिला पात्र ठरल्या होत्या, मात्र आतापर्यंत केवळ ४,८३२ महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला. उर्वरित ६२,२६८ महिलांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार असून, यासाठी ८७ कोटी ४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने जेंडर बजेट अंतर्गत महिला व बालकल्याण योजनेंतर्गत २१ डिसेंबर २०२३ रोजी ६४,०१४ महिलांसाठी शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्रांची खरेदीला मंजुरी मिळाली होती. मात्र, शिवणयंत्राच्या अर्थसहाय्यातील बदलामुळे लाभार्थींची संख्या वाढून ६९,६८९ झाली. यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये या योजनांना अंतिम मंजुरी मिळाली.

MMRDA Golden Jubilee Budget : एमएमआरडीएच्या सुवर्ण महोत्सवी अर्थसंकल्पात आहे तरी काय?

बृहन्मुंबई महानगरपालिका लेखा विभागाने अर्जांची पडताळणी केल्यानंतर एकूण ६७,१०० लाभार्थी पात्र ठरले. त्यामध्ये शिवणयंत्रासाठी ३५,३५८, घरघंटी यंत्रासाठी ३१,३०३ आणि मसाला कांडप यंत्रासाठी ४३९ महिलांची निवड करण्यात आली. आता लवकरच उर्वरित महिलांपर्यंत ही मदत पोहोचवली जाणार आहे, त्यामुळे अनेक महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -