जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात झालेल्या भीषण चकमकीत ५ दहशतवादी ठार झाले असून ४ सैनिक हुतात्मा झालेत. तसेच या चकमकीत एका डीएसपीसह ५ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. यामध्ये एका पॅरा कमांडोचाही समावेश आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार जैश-ए-मोहम्मदच्या पीपल्स अँटी-फासिस्ट फ्रंट या संघटने हे दहशतवादी २३ मार्च रोजी हिरानगरच्या सान्याल गावात दिसले होते. रविवारी सकाळी ८ वाजता, हिरानगरच्या राजबाग परिसरातील जुठाणाच्या अंबनाळमध्ये एका ग्रामस्थाने ५ सशस्त्र दहशतवादी पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. हे दहशतवादी बिलावरकडे जात होते. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांचा एक ताफा घटनास्थळी पोहोचला. यावेळी दहशतवाद्यांनी स्वतःला वेढलेले पाहून गोळीबार सुरू केला.
Transgender Crime : युवतीला पळवून नेण्याचा तृतीयपंथीयाचा प्रयत्न फसला
डीएसपी आणि इतर जवान चकमकीच्या ठिकाणी अडकले आणि सुरक्षा दलांच्या आगमनानंतर डीएसपीला जखमी अवस्थेत सुरक्षितपणे वाचवण्यात आले. त्यानंतर या दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहिम राबवण्यात आली. या ऑपरेशनमध्ये लष्कर, बीएसएफ, पोलिस आणि सीआरपीएफचे जवान सहभागी झालेत. दहशतवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून चकमकीच्या ठिकाणी अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले. तसेच हेलिकॉप्टर, यूएव्ही, ड्रोन, डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली. तब्बल दीड तास चाललेल्या चकमकीनंतर (कठुआ एन्काउंटर) अचानक गोळीबार थांबला. नंतर पोलिसांनी रॉकेट लाँचरचा वापर केला. दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला जो संध्याकाळपर्यंत सुरू होता.