Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रChandrashekhar Bavankule : उद्धव ठाकरे हे तर औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या

Chandrashekhar Bavankule : उद्धव ठाकरे हे तर औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

मुंबई : हिंदुत्व आमच्या डीएनए मध्येच आहे पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला. आणि आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन बसले. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले असल्याचे सांगत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल चढविला आहे.

सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे त्याचे एक उदाहरण आहे, असे म्हणत शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे आता औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री असताना जनतेला काय दिले? असा उलट सवाल बावनकुळेंनी (Chandrashekhar Bavankule) ठाकरेंना केला.

Girish Mahajan : गिरीश महाजनांना दुखापत

आता हिंदुत्वावर बोलण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार उरलेला नाही. भाजपचा ‘सौगात-ए-मोदी’ हा कार्यक्रम नाही, ही विकासाची गॅरंटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाला २४ तास वीज, पाणी, रस्ते, घरे आणि रोजगार दिला असल्याचे बावनकुळे ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले.

त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडली

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकली. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या मोदींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही, असे टीकास्त्र बावनकुळेंनी ठाकरेंवर डागले.

आता हेच लोक का प्रिय झाले आहेत?

गुन्हेगार, बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना सरंक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्याच्या मार्गाने व्यवस्थित बंदोबस्त करीत आहेत. पण आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत? याची उत्तरं आधी त्यांनी जनतेला द्यावीत, असे म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -