सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील महापौर बंगला परिसरातील नामांकित शाळेत ‘एलकेजी’त शिकणाऱ्या चिमुकलीवर तेथील ५५ वर्षीय शिपायाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. ऑक्टोबरपासून म्हणजे सहा महिन्यांपासून त्या चिमुकलीचा लैंगिक छळ होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पीडितेच्या आईने सदर बझार पोलिसांत फिर्याद दिल्यावर पोलिसांनी फ्रान्सिस आशिष पिंटो या शिपायाला शाळेतूनच जेरबंद केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त यशवंत गवारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
५५ वर्षीय शिपाईने केला चिमुकलीचा छळ
बदलापूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. असाच प्रकार सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेत घडला आहे. शाळेतील ५५ वर्षीय शिपाईच एलकेजी शिकणाऱ्या चिमुकलीचा छळ करीत होता. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर हा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी फ्रान्सिस पिंटो याची पोलिस कोठडी उद्या संपणार असून तपास अजून बाकी असल्याने आम्ही आरोपीची पोलिस कोठडी वाढवून घेणार असल्याचे तपास अधिकारी गवारी यांनी सांगितले.
Nitin Gadkari on Zojila Tunnel : झोजिला बोगद्याचे ७० टक्के काम पूर्ण- नितीन गडकरी
प्रिन्सिपल मान्य करत नव्हते
शहराच्या मध्यवर्ती महापालिकेच्या जवळ असणाऱ्या नामांकित शाळेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समजल्यावर असे काही झालेच नसावे, अशी भूमिका तेथील प्रिन्सिपलची होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. पिन्सिपल दालनात सीसीटीव्ही कॉमेऱ्यांचे चित्रण २४ तास सुरू असते. तरीही हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही. हा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षकांकडून काढून सहायक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.