
मुंबई : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बजेट सिनेमाला ब्रेक लागला असून, ‘टायगर वर्सेस पठाण’ (Tiger vs Pathan) हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे, (Salman Khan Movie Tiger vs Pathan Postponed) अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी सिनेमांविषयी महत्त्वाचे खुलासे केले.
शाहरुख खानच्या ‘जवान’ ला ब्लॉकबस्टर हिट देणाऱ्या दिग्दर्शक अॅटलीसोबत सलमान एका बिग बजेट चित्रपटासाठी काम करणार होता. मात्र, फंडिंगच्या अडचणीमुळे हा प्रोजेक्ट तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. सलमानने स्पष्ट केले की, "आम्ही हा प्रोजेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत."

मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. आजवर राम चरणने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज अभिनेत्याचा ४०वा ...
तसेच, अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता, पण वाढलेल्या बजेटमुळे निर्मात्यांनी हा सिनेमा पुढे ढकलला आहे.
याशिवाय, सलमानने संजू बाबासोबतच्या (संजय दत्त) नव्या चित्रपटाविषयी सांगितले की, हा चित्रपट पूर्णपणे देहाती शैलीतील आणि नेक्स्ट लेव्हल असणार आहे. मात्र, त्याने अधिक तपशील उघड केले नाहीत.
‘अंदाज अपना अपना 2’ बद्दलही मोठा खुलासा करताना सलमान म्हणाला, "हो, मी आणि आमिर दोघेही खूप उत्साहित आहोत. दिग्दर्शक राजकुमार संतोषी काहीतरी भन्नाट घेऊन येणार आहेत."

मुंबई: ‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर ...
‘बजरंगी भाईजान’ च्या सिक्वेलबद्दल विचारले असता, "हो, हा प्रोजेक्ट होऊ शकतो. कबीर खान यावर काम करत आहे," असे तो म्हणाला.
सलमान खानने सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचीही घोषणा केली. चित्रपटाचे नाव जाहीर झाले नसले तरी लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.
या घोषणांमुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, आता त्याचा पुढील चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करतो, हे पाहणे उत्साहवर्धक ठरेल.