Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीMahindra : महिंद्राने भारतीय टेबल द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात करत गाठला २० वर्षांचा...

Mahindra : महिंद्राने भारतीय टेबल द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात करत गाठला २० वर्षांचा टप्पा

नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा एक भाग आणि भारतातून टेबल द्राक्षे निर्यात करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक महिंद्रा अ‍ॅग्री सोल्युशन्स लिमिटेड (MASL) ने भारतीय द्राक्षांची जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याच्या कामामध्ये २० वर्षांचा महत्वपूर्ण टप्पा गाठल्याची घोषणा आज केली. २००५ मध्ये महिंद्राने युरोपला पहिल्यांदा द्राक्षांची निर्यात केली होती. आज MASL तर्फे उत्तर अमेरिका, युरोप, चीन, आग्नेय आशिया आणि इतर अनेक देशांमध्ये उच्चतम दर्जाची गुणवत्ता, सुरक्षा मानके आणि शाश्वत पद्धतींसह द्राक्षे पुरवली जातात.

MASL विविध प्रकारची उच्च दर्जाची द्राक्षे निर्यात करते. त्यामध्ये पांढरी बिनबियांची थॉमसन आणि सोनाका, लाल बिनबियांची फ्लेम आणि क्रिमसन तसेच काळी बिनबियांची जंबो आणि शरद द्राक्षे समाविष्ट आहेत. ही द्राक्षे ‘Saboro’ आणि ‘Frukinz’ या ब्रँडखाली उपलब्ध आहेत.

नाशिकमध्ये असलेल्या अत्याधुनिक द्राक्ष पॅक हाऊसच्या सहाय्याने MASL च्या द्राक्ष व्यवसायाला पाठबळ मिळत असून द्राक्षांच्या कापणीपश्चात व्यवस्थापनासाठी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. २०१९ मध्ये उद्घाटन झालेल्या या पॅक हाऊसमध्ये उत्पादनाचा मागोवा घेणे सुनिश्चित करत पुरवठा साखळी दरम्यान पिकाचा ताजेपणा कायम ठेवत संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित करून द्राक्षांची निवड आणि पॅकिंग केले जाते.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ

MASL चा द्राक्ष व्यवसाय नाशिक, बारामती आणि सांगली येथील ५०० हून अधिक शेतकऱ्यांसोबत जवळून कार्य करतो. हा या क्षेत्रातील कृषी परिक्षेत्राचा महत्वपूर्ण भाग आहे. द्राक्ष उत्पादन आणि पिकांची काळजी यामध्ये शेतकऱ्यांना कौशल्य मार्गदर्शन पुरवत या शेतकऱ्यांकडून उच्च गुणवत्तेची टेबल द्राक्षे घेतली जातात. यामध्ये सिंचन आणि शेती पद्धतीत सुधारणा तसेच रासायनिक इनपुट व पाण्याचा कमी वापर यावर भर देण्यात येतो. त्यामुळे द्राक्ष शेतीशी संबंधित कार्बन फूटप्रिंट कमी होतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.

उत्पादनात ३ पट वाढ

MASL टेबल द्राक्षांचे उत्पादन आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया नव्याने परिभाषित करत असतानाच, स्थानिक समुदायाच्या कल्याणासाठी रोजगार निर्मिती आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय भूमिका बजावत आहे. MASL ने शेतकऱ्यांना त्यांच्या निर्यातयोग्य उत्पादनात ३ पट वाढ करण्यास सक्षम केले आहे (२.५ MT प्रति एकर वरून ७.५ MT प्रति एकरपर्यंत).

MASLची २० वर्षांची वाटचाल

MASL च्या २० वर्षांच्या द्राक्ष निर्यातीच्या महत्वपूर्ण टप्प्याबाबत बोलताना MASL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश रामचंद्रन म्हणाले, “गेल्या २० वर्षांत आमच्या द्राक्ष व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही साध्य केलेल्या गोष्टींचा MASL मध्ये आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. द्राक्षांसारख्या उच्च मूल्य असलेल्या फळ पिकाद्वारे शाश्वतरीत्या गुणवत्ता, उत्पादनक्षमता आणि शेतकऱ्यांचा नफा वाढवण्याचे ध्येय आम्ही निश्चित केले होते. ही २० वर्षांची वाटचाल संपूर्ण कृषी मूल्यसाखळीच्या परिवर्तनासाठी दिलेल्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आमच्या प्रयत्नांचा परिणाम भारतीय टेबल द्राक्षांचे उत्पादन आणि भारतातून जगातील इतर भागांमध्ये निर्यात करण्याच्या पद्धतीत झालेल्या लक्षणीय सुधारणांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच या प्रदेशातील हजारो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणे आम्हाला शक्य झाले याबद्दल आम्हाला धन्यता वाटत आहे.”

रमेश पुढे म्हणाले, “अत्याधुनिक पद्धतीने निवड, पॅकिंग आणि साठवणूक सुविधांसह, आमचे नाशिकमधील द्राक्ष पॅकहाऊस उद्योगासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. प्रत्येक टेबल द्राक्ष जागतिक ग्राहकांच्या कठोर निकषांना खरे उतरेल हे सुनिश्चित करत ही सुविधा उच्च दर्जाची गुणवत्ता, चव आणि ट्रेसिबिलिटी राखण्यासाठीच्या प्रणालीबद्ध पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे.”

सोलापूर : धक्कादायक! ५५ वर्षाच्या शिपायाकडून चिमुकलीवर ६ महिन्यांपासून अत्याचार

७५,००० चौरस फूट क्षेत्रफळ व्यापणारे महिंद्रा द्राक्ष पॅकहाऊस ६.५ एकर जमिनीवर वसलेले आहे आणि प्रतिदिन ८० मेट्रिक टन (MT) द्राक्षांचे पॅकिंग करण्याची क्षमता आहे. या पॅकहाऊसमध्ये १२ प्रीकूलिंग चेंबर्स आणि १७० मेट्रिक टन (MT) प्रत्येकी क्षमता असलेली थंड हवेत साठवण करण्याच्या २ कोल्ड स्टोरेज फॅसीलिटी आहेत. यामुळे द्राक्षांचा ताजेपणा टिकून राहतो. प्रति शिफ्ट ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या या द्राक्ष पॅकहाऊसच्या सर्व प्रक्रिया MASL च्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांकडून व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित आणि नियंत्रित केल्या जातात. त्यामुळे पॅकहाऊस सातत्याने जागतिक बाजारपेठांसाठी गुणवत्ता, सातत्य, एकसंधता आणि ट्रेसिबिलिटी याची पूर्तता करते.

महिंद्राच्या द्राक्ष पॅकहाऊस सुविधेच्या केंद्रस्थानी शाश्वतता आहे. सर्वत्र ऊर्जा कार्यक्षम LED दिवे बसवले आहेत आणि कॅप्टिव्ह सोलर पॉवर जनरेशनसाठीची सोय आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी एक प्रणाली कार्यरत असून ती 7 दशलक्ष लिटर पाणी साठवू शकते. इतर शाश्वत उपाययोजनांच्या अंतर्गत, इन-हाऊस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Sewage Treatment Plant) आहे. या प्रकल्पातून प्यायला नाही पण बागकामासह विविध कारणांसाठी उपयुक्त पाणी पुरवले जाते. या द्राक्ष पॅकहाऊस सुविधेला बीआरसीजीएस (पूर्वीचे British Retail Consortium), फेअरट्रेड, SMETA (SEDEX), ग्लोबल गॅप आणि स्प्रिंग या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, तसेच FSSAI आणि APEDA कडूनही स्थानिक पातळीवर प्रमाणपत्र मिळाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -