मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने बुधवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव करत यंदाच्या आयपीएल हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीवीर क्विंटन डिकॉक कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाचा शिल्पकार ठेवला. त्याने नाबाद ९७ धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. मात्र, एक गोष्ट सगळ्यांच्याच नजरेत भरली ती म्हणजे या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या साथीला सलामीला आलेला मोईन अली. मोईन अलीला कालच्या सामन्यात सुनील नरेनच्या जागी संघात घेण्यात आले होते.
IPL 2025 Glenn Maxwell : आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल सर्वाधिक वेळा शून्यावर झालाय बाद
गेल्या अनेक हंगामांपासून सुनील नरेन हा केकेआर संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. काल १६२८ दिवसांनी पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सुनील नरेन याच्याशिवाय खेळत होता. त्यामुळे अनेकांचा आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, सुनील नरेनच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला.
प्रकृती ठिक नसल्याने संघातून वगळले
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य राहणे नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा त्याने सुनील नरेनच्या न खेळण्यामागचे कारण समोर आले. गुवाहाटीला झालेल्या या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजिंक्य रहाणे याने प्लेईंग ११मध्ये बदल केल्याचे सांगितले. सुनील नरेनच्या जागी मोईन अलीला संघात घेण्यात आल्याचे त्याने जाहीर केले. त्यामुळे सुरुवातीला चाहत्यांना नरेनला दुखापत झाली आहे का, अशी शंका वाटली. मात्र, सुनील नरेनची प्रकृती ठीक नसल्याने तो आजच्या सामन्यात खेळणार नाही, असे अजिंक्य रहाणेने स्पष्ट केले.