मुंबई: ऋषभ पंतच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील विजयाची चव चाखली आहे. लखनऊच्या संघाने आपला दुसरा सामना गुरूवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ५ विकेटनी विजय मिळवला.
हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. यात टॉस हरल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने १९१ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात लखनऊच्या संघाने ४ विकेट गमावत १६.१ षटकांतच हा सामना जिंकला.
या डावात निकोलस पूरनने १८ आणि मिचेल मार्शने २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरही हिरो राहिला. त्याने ४ विकेट मिळवल्या. लखनऊसाठी पूरनने २६ बॉलमध्ये ७० धावांची तडाखेबंद खेळी केली. या दरम्यान ६ षटकार आणि तितकेच चौकार ठोकले.
तर मिचेल मार्शने ३१ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या. या दरम्यान २ षटकार आणि ७ चौकार ठोकले. अखेरीस कर्णधार ऋषभ पंतने १५ आणि अब्दुल समदने नाबाद २२ धावा केल्या. हैदराबाद संघासाठी कर्णधार पॅट कमिन्सने २ विकेट मिळवल्या. तर मोहम्मद शमी, एडम झाम्पा आणि हर्षल पटेलला प्रत्येकी १ विकेट मिळवता आला.