Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

NMMC recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नवी मुंबई महापालिकेत ६२० पदांची भरती

NMMC recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नवी मुंबई महापालिकेत ६२० पदांची भरती

'असा' करा अर्ज


मुंबई : सध्या अनेक तरुण सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने तब्बल ६२० पदांची भरती जारी केली आहे. याबाबत जाहीरात काढली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट आणि गट डमधील विविध संवर्गातील पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महापालिकेने उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.



नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. या जाहिरातीनुसार गट'क' व गट 'ड' मधील एकूण ६२० पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८ मार्च २०२५ पासून ते दिनांक ११ मे २०२५ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर ११ मे २०२५ रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकणार आहेत.



नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया परीक्षा शुल्क 



  • खुला प्रवर्ग - १००० रुपये

  • मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग - ९००


परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. तसेच संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



कोणत्या पदांसाठी भरती आणि पगार किती?



  • बायोमेडिकल इंजिनियर पदासाठी भरती आहे. या पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे.

  • ज्युनिअर सिविल इंजिनियर, ज्युनियर बयोमेडिकल इंजिनियर, उद्यान अक्षिक्षक, माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवर या पदांसाठी ३८६००-१२८०० रुपये पगार मिळणार आहे.

  • डेंटल हायजिनिस्ट पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे.

  • स्टाफ नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, इसीजी तज्ञ, सी.एस.एस.डी तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ या पदासाठी ५४०० ते ११२४०० पगार मिळणार आहे.

  • नेत्र चिकीत्सक सहाय्यक पदासाठी ३५४०० ते ११२४०० रुपये पगार मिळणार आहे.

  • आरोग्य सहाय्यक महिला, औषध निर्माण अधिकारी या पदांसाठी २९२००-९२३०० रुपये गार मिळणार आहे.

  • याचसोबत उद्यान सहाय्यक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे.

Comments
Add Comment