
मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग अशी ख्याती असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मध्ये नेहमीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल याचे नाव आघाडीवर आहे. मात्र मंगळवारी पंजाब किंग्ज संघाकडून खेळणारा मॅक्सवेल गुजरात विरुद्धच्या सामन्यात शून्यवर तंबूत परतला आणि त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

मुंबई : आयपीएल २०२५ स्पर्धेला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील ...
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मंगळवारी खेळला गेला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला मोठा धक्का बसला. तो खाते न उघडताच तंबूत परतला. त्याला साई किशोरने यष्टीचीत केले. या कामगिरीमुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला. आयपीएलमध्ये तो खाते न उघडता बाद होण्याची त्याची १९ वी वेळ होती. आयपीएलमध्ये खेळाडू नवनवीन विक्रमासाठी जीवाचे रान करत असतात.