मुंबई : दुबई आणि मुंबईला थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना संयुक्त अमिरातीच्या डोक्यात घोळू लागली आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास संपूर्ण पाण्याखालून जाणारा २ हजार किलोमीटर लांबीचा हा पहिला रेल्वे मार्ग ठरेल.
मध्यपूर्व आणि भारताला जोडणारा संयुक्त अरब अमिरातीचा हा न भूतो न भविष्यती पायाभूत प्रकल्प समजला जातो. अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे मुख्य सल्लागार आणि व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल्शेही यांनी याप्रकल्पाची घोषणा केली. दुबई ते मुंबई जोडणारी समुद्राखालची रेल्वे उभारणे कितपत शक्य आहे, याचा अभ्यास करण्याची योजना हाती घेतल्याचे ते म्हणाले. दुबई ते मुंबई रेल्वे ही प्रचंड वेगवान असेल आणि हा रेल्वे मार्ग अंदाजे २ हजार किलोमीटर लांबीचा असू शकेल.
Ratnagiri Water Supply : रत्नागिरीत एप्रिलपासून दर सोमवारी होणार पाणीपुरवठा बंद!
ही रेल्वे पूर्णत: समुद्राखालून जाईल. मुंबईहून निघणारी रेल्वे संयुक्त अरब अमिरातीच्या फूजैराह शहरात पोहोचेल. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही देशातला प्रवास आणि व्यापार वाढविण्याबरोबरच उभय देशात अरबांच्या तेलाची भारताला निर्यात आणि भारताच्या नर्मदेचे पाणी अरब देशांना आयात करण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे, असे अब्दुल्ला म्हणाले.
अर्थात, दुबई-मुंबई जोडणार्या रेल्वे प्रकल्पाची कल्पना तूर्त कागदावरच आहे. या प्रकल्पाची आधी व्यवहार्यता तपासली जाईल. या प्रकल्पाच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक बाजू तपासल्या जातील. कारण, इंजिनिअरिंग क्षेत्रात केवळ चमत्कार म्हणूनच या प्रकल्पाकडे भविष्यात पाहिले जाऊ शकते.