एकूण गुंतवणूक ₹३,९२,०५६ कोटी
विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना
मुंबई : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत एकूण ₹३,९२,०५६ कोटी गुंतवणुकीच्या १७ महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या गुंतवणुकीतून राज्यात १,११,७२५ प्रत्यक्ष आणि २.५ ते ३ लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.
यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून राज्यात अनेक महत्त्वाच्या उद्योग प्रकल्पांना सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या गुंतवणुकीमुळे