Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : गद्दार कोण? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde : गद्दार कोण? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “गद्दार कोण? याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. आता जनतेच्या न्यायालयातही उत्तर मिळाले आहे,” असे ते म्हणाले.

“मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना शहाणपण आले असेल!”

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटले, मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना निकालामुळे शहाणपण आले असेल. गद्दार, गद्दार म्हणत भुई ठोकत बसा. तुम्हाला दार बंद करून पक्षाचे दुकान बंद करावे लागेल. गद्दार कोण? याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. पण, जनतेच्या न्यायालयात सुद्धा गद्दार कोण? खुद्दार कोण? याचा निकाल दिला आहे. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, फक्त टीका करून राजकारण होत नाही, काम करावे लागते!

“आम्ही विकासाची तुफान बॅटिंग केली, विरोधक क्लीनबोल्ड!”

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “प्रत्येक गोष्टीसाठी कारण सांगणाऱ्यांचा काळ संपला. आम्ही विकासाची तुफान बॅटिंग केली आणि विरोधक आमच्या स्कोरच्या पाठलागात क्लीनबोल्ड झाले. आमची नवी इनिंग सुरू झाली असून आमची बॅटिंग टी-२० सारखी आहे—कमी चेंडूत जास्त धावा काढायच्या!”

तुमचा खोटारडेपणा सगळ्यांना कळून चुकला

“कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘मोठे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे. गरीबांच्या तोंडची खिचडी खाणारे.’ तुमचा खोटारडेपणा सगळ्यांना कळून चुकला आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता…,’ ‘जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमें क्या गिराएंगे, हमारे दुश्मनों से कहो अपना कद ऊँचा करें… बराबरी होगी, तोही मुकाबले मैं मजा होगी,’” अशी शेरोशायरी करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना आव्हान दिले आहे.

“घरी बसवलेल्यांना पुन्हा घरी पाठवले!”

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल…. बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे. त्यामुळे शिवसेना उभी राहिली. मात्र, आज काय चाललंय, ते जनता पाहतेय.

शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना स्पष्ट शब्दांत सांगितले, “अडीच वर्षे रोज आरोप झाले. पण, आम्ही कोणाची चिंता करत नाही. विरोधकांनी स्वतःची काळजी करावी. जनता ठरवते कोणाला सत्ता द्यायची. रोज शिव्या-शाप देऊन काहीही साध्य होत नाही. दुसऱ्यांची लाईन कापण्याऐवजी स्वतःची मोठी करा!”

“गरीबांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्यांचा खोटारडेपणा उघड!”

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंच्या स्टाईलमध्ये शेरोशायरी करत टोले लगावले,

“मोठे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे,
गरीबांच्या तोंडची खिचडी खाणारे, खोटारडेपणा उघड झाला रे!”

“सुपारी देऊन बदनामीच्या मोहिमा चालवल्या जात आहेत”

एकनाथ (Eknath Shinde) शिंदेंनी कुणाल कामरा याच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, “पाखंडी लोक पुढे करून शिखंडी लोक आधार घेत आहेत. कोणाच्या सुपारीवर आम्ही काही बोलत नाही, पण सत्य लपून राहत नाही.”

“डस्टबीनमध्ये कोण होतं?” – उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंच्या “एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये आहेत” या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत म्हणाले, “काही मिस्टर बीन डस्टबीनचा उल्लेख करत होते, पण डांबरचे सांबर कोणी खाल्ले?”

ते पुढे म्हणाले, “सामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती होती, पण त्याच कचऱ्यातून ऊर्जा निर्माण झाली आणि शॉक बसला. त्यातून अजून काहीजण सावरले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबीनमध्ये टाकली गेली होती. आम्ही तिला बाहेर काढले!”

“मुंबईचे रस्ते सुधारले, पण काहींना जळफळाट!”

मुंबईतील रस्त्यांच्या विकासावर बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “७०१ किमी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. गेल्या १०-१५ वर्षांत ३००० कोटी रुपये वाया गेले. आता डांबरात हात काळे करता येणार नाही. राजाचा जीव पोपटात असतो, तसा काहींचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे. सिमेंटच्या रस्त्याची चौकशी करावी, अशी काहीजण मागणी करतायेत. चौकशी तर झालीच पाहिजे. परंतु, १५ वर्षांत डांबरचे सांबर कुणी खाल्ले, हे सुद्धा समोर आले पाहिजे,” असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“बात निकलेगी तो दूर तक जायेगी!”

शिंदेंनी ठाकरेंना स्पष्ट इशारा दिला, “काही जण तीन-तीन ग्लास पाणी पीतायत, चहा पितायत… मला जास्त बोलायला लावू नका. बात निकलेगी तो दूर तक जायेगी!” असा इशारा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंचा नाव न घेता दिला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या या भाषणामुळे आगामी राजकीय समीकरणे अधिक तापणार, हे निश्चित!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -