Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीधक्कादायक! धावत्या रेल्वेमध्ये टीसीकडून तरुणीचा विनयभंग

धक्कादायक! धावत्या रेल्वेमध्ये टीसीकडून तरुणीचा विनयभंग

मनमाड : पुणे शिवशाही बस मधील तरुणीवर झालेल्या अत्याचाराची बातमी ताजी असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या रेल्वे असो,एसटी बस स्टॅन्ड असो अथवा सार्वजनिक ठिकाण कुठेच महिला,मुलीवर सुरक्षित नाही बहुतांश ठिकाणी महिलावर अन्याय अत्याचाराच्या घटना सुरूच असून अशीच एक धक्कादायक घटना गोरखपूर-बंगळुरू या विशेष धावत्या रेल्वे गाडीत भुसावळ-मनमाड दरम्यान घडली.गाडीतील तिकीट तपासणाऱ्या टीसीने एका तरुणीचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केला असून घाबरलेल्या या तरुणीने अक्षरशः डब्यातील शौचालयात स्वतःला कोंडून घेत टीसी पासून आपली अब्रू वाचवली आहे.या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी टीसीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Mumbai Airport : धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

मिळालेल्या माहिती नुसार सुमारे २२ वर्षाची तरुणी गोरखपूर-बंगळुरू विशेष प्रवासी रेल्वे गाडीने कानपूरहून पुण्याला जाण्यासाठी प्रवास करीत होती.तिच्याकडे कन्फर्म रिजेर्वेशन तिकीट नव्हते तीचे तिकीट आरएसी असल्याने तीने गाडीत असलेल्या तिवारी नावाच्या टीसीकडे सीट उपलब्धते बाबत विचारणा केली असता त्याने तिला गाडीतील बी-4 कोचमध्ये बसण्यास सांगितले मात्र त्या डब्यात जागा रिकामी नसल्याने या टीसीने या तरुणीला ए-1 कोचमधील ५ नंबर सीट दिली असता ही तरुणी त्या सीटवर जाऊन बसली काही वेळा नंतर तिवारी या तरुणीकडे आला आणि तिच्या सीटवर येऊन बसला आणि तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा झालेला प्रकार कदाचित नजरचुकीमुळे झाला असावा असा समज या तरुणीचा झाला मात्र तिवारीने दोन ते तीन वेळा असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सदर तरुणी प्रचंड घाबरली आणि डब्यातील शौचालयात कोंडून घेत तेथून तीच्या वडिलांना फोन केला आणि तीच्या सोबत टीसी तिवारीने केलेल्या गैरवर्तानाची माहिती दिली. त्यांनी रेल्वे पोलीस कंट्रोलरूमशी संपर्क साधला आणि मुलगी, गाडी याची सर्व माहिती दिली. तो पर्यंत गाडी मनमाडला पोहचणार होती.कंट्रोल रूम मधून मॅसेज मिळताच रेल्वे पोलिसांनी प्लॉट फर्मवर धाव घेऊन गाडी येताच तिवारीला ताब्यात घेतले सदर तरुणी देखील मनमाडला उतरली आणि तिने टीसी तिवारी विरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तिवारी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -