Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजविधान भवनात वीज पुरवठा खंडीत

विधान भवनात वीज पुरवठा खंडीत

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरू असताना दुपारी काही सेकंदांसाठी विधान भवनाच्या इमारतीचा वीज पुरवठा खंडीत झाला. जनरेटर बॅकअप असल्यामुळे कामकाज ठप्प झाले नाही. पण दोन्ही सभागृहात दिवे चमकल्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याचे काही जणांच्या लक्षात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष

याआधी सकाळच्या सत्रात विधानसभेत उपाध्यक्षांची एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज सादर झाला होता. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज आला नव्हता. यामुळे बनसोडे यांच्या निवडीची औपचारिकता उरली होती. बुधवारी २६ मार्च रोजी अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नंतर इतर विषयांतील कामकाज झाले.

संतोष देशमुख प्रकरणी १० एप्रिलला आरोप निश्चित होणार ?

शेवटच्या दिवशी विधानसभेत चर्चा सुरू असताना आमदार राम कदम यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणात तत्कालीन उद्धव सरकारने अधिकारांचा गैरवापर करत पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंचे समर्थक रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत बोलत होते, असाही आरोप आमदार राम कदम यांनी सभागृहात बोलताना केला. राम कदम यांनी आरोप करताच उद्धव समर्थकांनी सभागृहात नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण राम कदम त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. उद्धव सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला की नाही आणि केला असल्यास नेमकी काय कृती केली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी सरकारकडे केली. ही मागणी त्यांनी सभागृहात बोलताना केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -