मुंबई : महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेग्विन कक्ष पेंग्विन आरोग्य व्यवस्थापन प्रणालीची देखभाल करण्यासाठी एकही कंत्राटदार कंपनीपुढे येत नसून पुन्हा एकदा या पेंग्विन पिंजऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवरच सोपवण्यात आली आहे. पुढील ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यासाठी तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च देखभालीवर केला जाणार आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात १८ मार्च २०१७ पासून हंबोल्ट पेंग्विन कक्ष सुरू करण्यात आला. हे हंबोल्ट पेंग्विन पक्षी परदेशातून आयात करून प्रथमच भारतात आणले गेले.
Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी मंजूर
महापालिकेकडे हंबोल्ट पेंग्विन हाताळणी व व्यवस्थापन करण्याकरिता लागणारा तज्ञ कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने हंवोल्ट पेंग्विन व हंबोल्ट पेंग्विन कक्षाचे देखभाल आणि देखरेख तसेच आरोग्य व्यवस्थापन करण्याकरीता ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी यापूर्वी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी निवड करण्यात आली होती, या कंपनीचा कालावधी संपुष्टात आल्याने आता पुढील तीन वर्षांकरता नव्याने निविदा मागवली होती; परंतु या निविदेमध्ये पुन्हा एकदा एकमेव हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीनेच भाग घेतला आहे. या व्यतिरिक्त एकही कंपनी पुढे आली नाही. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने एक टक्का कमी दर आकारुन बोली लावली असून या कंपनीची पुढील तीन वर्षांकरता निविड करण्यात आली आहे.