Saturday, May 10, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Mumbai Airport : धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

Mumbai Airport : धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात सापडले नवजात बाळ

मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनलवर एक धक्कादायक घटना घडली आहे. टर्मिनल २ वर एका कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळ सापडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार, २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी त्वरित बाळाला पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बाळाला येथे कोणी व का सोडले याचा शोध घेतला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, टर्मिनल २ मधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना मंगळवार, २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता एका कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना एका नवजात बाळाचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आणि वैद्यकीय पथकाला पाचारण केले. बाळ अत्यंत अशक्त स्थितीत होते, त्यामुळे त्याला तातडीने कूपर रुग्णालयात हलवण्यात आले.



">


मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासाअंती विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांचा अंदाज आहे की, कोणीतरी बाळाला सोडून निघून गेले असावे.यामुळे पोलिसांनी त्वरित बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी परिसरातील रुग्णालये, महिलांसाठी असलेली निवासस्थाने आणि विमानतळावरून निघालेल्या प्रवाशांची यादी तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मुंबईतील अनाथालये आणि सामाजिक संस्थांकडूनही माहिती घेतली जात आहे.


याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास वेगाने सुरू आहे. बाळाच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवले जात असून, त्याला योग्य वैद्यकीय मदत दिली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment