
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन तर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
अनुराग ठाकूर यांच्या क्षयरोग-मुक्त भारत अभियानासाठी नेते आणि अभिनेते आले एकत्र
मुंबई : मुंबईतील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर क्षयरोग-मुक्त भारतासाठी (TB-free India) एक अनोखा मैत्रीपूर्ण टी-२० क्रिकेट सामना खेळवला गेला, जिथे नेत्यांची टीम विरुद्ध अभिनेता संघ असा थरारक सामना रंगला. हा सामना माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अनुराग सिंह ठाकूर यांच्या क्षयरोग-मुक्त भारत जागरूकता अभियानाचा भाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले, तर समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सामना पाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये सलमान खान, खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रीतम मुंडे यांच्यासह बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग होता.

नवी दिल्ली : महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी मोदी सरकारने (Modi Government) एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. स्वर्णिमा योजना (Swarnima Scheme) अंतर्गत मागासवर्गीय महिलांना ...
नेता विरुद्ध अभिनेता – मैदानावर रंगला अनोखा सामना!
नेता ११ संघाचे नेतृत्व अनुराग सिंह ठाकूर यांनी केले, तर अभिनेता ११ संघाचे नेतृत्व सुनील शेट्टी यांनी केले. नाणेफेक जिंकत नेता संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामना सुरू झाला. क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून टीबी निर्मूलनाचा संदेश देण्याचा हा अनोखा उपक्रम ठरला.
‘आम्ही खेळणार, टीबी मात्र हरेल!’ – जनजागृतीसाठी पुढाकार
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, “भारतातील संसद १४० कोटी लोकांचे प्रतिनिधित्व करते. लोकप्रतिनिधींनी समाजात सकारात्मक बदल घडवायला हवा. २०२५ पर्यंत भारत क्षयरोग-मुक्त करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष्य आहे आणि या सामन्याच्या माध्यमातून हा संदेश प्रभावीपणे पोहोचेल. विशेषतः, या सामन्यात सहभागी झालेल्या सर्व नेते आणि अभिनेते समाजासाठी एक महत्त्वाचे योगदान देत आहेत.”
नेता संघाचे कर्णधार अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “क्षयरोग निर्मूलनासाठी आम्ही देशभर क्रिकेट सामने खेळून जनजागृती करू. मैदानात स्पर्धा असली तरी आपली खरी लढाई क्षयरोगाविरोधात आहे!”
अभिनेता संघाचे कर्णधार सुनील शेट्टी म्हणाले, “हा सामना फक्त क्रिकेटसाठी नसून, देशाला क्षयरोग-मुक्त करण्याच्या उद्देशाने आहे. विजय-पराभव गौण, मुख्य हेतू हा समाजासाठी योगदान देण्याचा आहे.”
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी या सामन्यात सहभाग घेतला.
नेता संघ: अनुराग सिंह ठाकूर (कर्णधार), कमलेश पासवान, मनोज तिवारी, राममोहन नायडू, मोहम्मद अज़हरुद्दीन, यूसुफ़ पठाण, श्रीकांत शिंदे, लावु श्रीकृष्ण, दीपेन्द्र हुड्डा, गुरमीत सिंह हेयर, के सुधाकर, चंद्रशेखर.
अभिनेता संघ: सुनील शेट्टी (कर्णधार), सोहेल खान, शरद केळकर, राजा भेरवानी, शबीर अहलुवालिया, दारुवाला फ़्रीडी, समीर कोचर, नवदीप तोमर, सनी देओल, अभिषेक कपूर, सिद्धार्थ जाधव, मुद्सिर भट्ट.
क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक भान!
हा सामना क्रिकेटच्या पलीकडे जाऊन सामाजिक जबाबदारी आणि जनजागृती करण्याचा एक अनोखा उपक्रम ठरला. क्षयरोग निर्मूलनासाठी हा प्रयत्न क्रिकेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास या सामन्यात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी व्यक्त केला. देशभरात असे अनेक सामने खेळून क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय साध्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.