Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025 : केकेआरने खोलले विजयाचे खाते, डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानची शरणागती

IPL 2025 : केकेआरने खोलले विजयाचे खाते, डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानची शरणागती

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या हंगामातील सहावा सामना बुधवारी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. गुवाहाटीच्या बारसापार क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना केकेआरने ८ विकेट राखत जिंकला.

क्विंटन डी कॉकच्या वादळासमोर राजस्थानने शरणागती पत्करली. डी कॉकने या सामन्यात ९७ धावा तडकावल्या. त्याने या खेळीदरम्यान ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. कर्णधार अजिंक्य रहाणेला १८ धावाच करता आल्या. अखेर कोलकाताने ८ विकेट आणि १५ बॉल राखत लक्ष्य गाठले.

यासोबतच अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातीली केकेआर संघाने या आयपीएल हंगामातील विजयाचे खाते खोलले. हा संघाचा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ७ विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर राजस्थानच्या संघाचा या हंगामातील हा सलग दुसरा पराभव आहे. त्यांना आपला पहिला सामना हैदराबादविरुद्ध खेळला होता. यात त्याने ४४ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. पहिल्या तीन सामन्यांमध्ये संजू सॅमसनच्या जागी राजस्थान संघाचे नेतृत्व रियान पराग करत आहे.

सामन्यात राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५१ धावा केल्या होत्या. संघासाठी विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलने २८ बॉलमध्ये ३३ धावांची खेळी केली. तर यशस्वी जायसवालने २४ बॉलमध्ये २९ धावा केल्या. कर्णधार रियान परागने १५ बॉलमध्ये २५ धावा ठोकल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -