Thursday, April 17, 2025
Homeताज्या घडामोडीKokan Heavy Rain : सिंधुदुर्गात पावसाचे धुमशान

Kokan Heavy Rain : सिंधुदुर्गात पावसाचे धुमशान

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने धुमशान घातले. कणकवली, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील बहुतांशी गावात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने त्रेधातिरपट उडवून दिली. सुमारे तासभर हा गडगडाटी पाऊस सुरु होता. यामुळे रखरखत्या उन्हाळ्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. बहुतांशी गावे अंधारात आहेत. कोनाळकट्टा येथे घरावर झाड पडून नुकसान झाल्याची घटना घडली. दरम्यान अवकाळी पावसाच्या नुसत्या चाहूलीनेच सावंतवाडी शहरातील महावितरणची बत्ती लगेच गुल झाली. केवळ वारा सुटला आणि बत्ती गुल झाली. कणकवली तालुक्यातील सह्याद्री पट्टयात या वादळी पावसाचा तडाखा बसला.

Panhala Fort : पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी मंजूर

कनेडी, भिरवंडे, हरकूळ खुर्द, फोंडाघाट परिसरातून वैभवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. दोडामार्ग तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. अवकाळी पावसामुळे काजू, आंबा बागायदार शेतकरी धास्तावला आहे. पावसामुळे आंबा फळ काळे पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -