Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Habitat Hotel : हॅबीटेट हॉटेल महापालिकेच्या रडारवर

Habitat Hotel : हॅबीटेट हॉटेल महापालिकेच्या रडारवर

मुंबई : कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केले त्या हॉटेल वजा क्लबमधील हॉलची तोडफोड शिवसैनिकांनी केली असली तरी या क्लबचे बांधकाम नियमबाह्य असल्याने यावरही लवकरच हातोडा पडणार आहे. या क्लबमधील तळघरात हा कार्यक्रम पार पडला होता; परंतु तळघरात (बेसमेंट) हॉलचा वापर करता येत नसून याठिकाणी नियमबाह्य वापर झाल्याने या जागेचा वापर बंद करून त्यावर कारवाई केली जाणार आहे. याव्यतिरिक्त येथील मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकाम याची तपासणी सुरू असून त्यानंतर आढळून येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.



दरम्यान,महापालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॅबीटेट हॉटेल/क्लबच्या तात्पुरती शेडचे बांधकाम तोडले. तसेच हे हॉटेल पुढील तपासणी होईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या जागेत हा कार्यक्रम सादर झाला होता, ती जागा तळघराच्या जागेत आहे. तळघराच्या जागेत मनुष्य वावर नसावा, ती जागा सामान ठेवण्याची असते. त्यामुळे एकाप्रकारे नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे याबाबतीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. हे हॉटेल कामरा यांच्या मालकीचे नसून या जागेत या कार्यक्रमाचे सादरीकरण झाल्याने हे हॉटेल महापालिकेच्या रडारवर आले आहे.

Comments
Add Comment