मुंबई : मुंबईत सध्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सध्या जोरात सुरु असून हाती घेतलेल्या रस्त्यांची कामे ३१ मे २०२५ पूर्वी पुणत्वास गेली पाहिजे. परंतु ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणार नाही, अशा रस्त्यांवर खड्डे झाले तर, त्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याची जबाबदारी प्रकल्प कंत्राटदाराची अर्थात त्या संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे. त्यासाठी आतापासूनच कंत्राटदारांनी मास्टिक कुकर आदी संयंत्रासह मनुष्यबळाची जुळवाजुळव करावी. पाऊस सुरु होण्यापूर्वी रस्ते वाहतूकयोग्य असावेत, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची मंगळवारी २५ मार्च २०२५ रोजी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले.अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह उप आयुक्त शशांक भोरे, प्रमुख अभियंता गिरीश निकम यावेळी उपस्थित होते. ज्या रस्त्यांबाबत विहित कालावधीत काम पूर्ण करण्यासंदर्भात अडचणी येत आहेत, अशा रस्त्यांची कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता यांनी बैठकीत रस्तेनिहाय चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेले काम पूर्ण करणे अनिवार्य राहील.
यावेळी बोलतांना डॉ भूषण गगराणी यांनी वरिष्ठ अभियंत्यांनी रस्ते कामांना भेट देवून आकस्मिक पाहणी करावी. विशेषतः कामे सुरु असताना रात्रीच्यावेळी भेटी द्याव्यात. केवळ तांत्रिकदृष्ट्या उपस्थित न राहता सक्रिय सहभाग दर्शवावा. पूर्ण झालेल्या काँक्रिट रस्त्यांवर खोदकामास मनाई आहे, याबाबत मध्यवर्ती संस्था आणि विभाग कार्यालय यांनी दक्षता घ्यावी. बांधणी पूर्ण झालेल्या रस्त्यांवर कोणत्याही परिस्थितीत खोदकामास परवानगी दिली जाणार नाही, असे गगराणी यांनी नमूद केले. येत्या ७० दिवसात म्हणजेच दिनांक ३१ मे २०२५ पूर्वी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे पूर्णत्वास गेली पाहिजेत.
त्यासाठी सूक्ष्म नियोजन, रस्तानिहाय काम पूर्ण करण्याची तारीख निश्चित करणे आवश्यक आहे. त्याचवेळी महानगरपालिकेच्या जल अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिस्सारण विभागांबरोबरच विविध उपयोगिता प्राधिकरण/ संस्था यांच्याशी सुयोग्य समन्वय साधून काँक्रिटीकरण कामे मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देशही गगराणी यांनी दिले. तर अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी मार्गदर्शन करताना असे निर्देश दिले की, ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यांना थर्मोप्लास्ट, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आईज, चौकांमध्ये पिवळ्या थर्मोप्लास्ट रंगाचे ग्रीड बसविणे इत्यादी कामे पूर्ण करावीत. पाऊस सुरु होण्यापूर्वी रस्ते वाहतूकयोग्य असावेत, असे निर्देशही बांगर यांनी दिले.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…