Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीछत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी उचलला कारवाईचा बडगा

रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापा टाकला. महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप घोटाळ्याच्या (Mahadev Betting App Scam) चौकशीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, यासंदर्भात भूपेश बघेल यांनी स्वतः ट्विटर (एक्स) वरून माहिती दिली.

महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप प्रकरणात आतापर्यंत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २,२९५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त आणि गोठवली आहे. या घोटाळ्याशी संबंधित एका मद्य गैरव्यवहाराच्या चौकशीदरम्यान १० मार्च रोजी ईडीने दुर्ग जिल्ह्यात १४ ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर काही दिवसांनी बघेल यांच्यावर छापे टाकण्याची कारवाई करण्यात आली. त्यावेळी बघेल यांनी एक्सवर पोस्ट करत ईडीला त्यांच्या निवासस्थानी ३३ लाख रुपयांची रोकड सापडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी स्पष्ट केले होते की, ही रक्कम शेती, दुग्धव्यवसाय आणि कौटुंबिक बचतीतून जमा करण्यात आली होती.

Devendra Fadanvis : डेटा सेंटर, स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल – मुख्यमंत्री फडणवीस

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा हा छत्तीसगडच्या भिलाईमधील काही व्यक्तींशी संबंधित असून, तो भारत आणि यूएईमध्ये चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कचा भाग आहे. ईडीने २०२३ मध्ये छत्तीसगडमध्ये छापेमारी करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप हा अनधिकृत प्लॅटफॉर्म होता, ज्याद्वारे क्रिकेट, फुटबॉलसह अनेक खेळांवर आणि जुगाराच्या इतर प्रकारांवर बेकायदेशीर सट्टा लावला जात होता.

देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या ऍपने झटपट पैसे कमावण्याचे आमिष दाखवून हजारो जणांना आकर्षित केले होते. तपास यंत्रणांनी याप्रकरणी मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा शोध घेतला असून, संबंधित व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -