Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वStock Market : ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक; शेअर बाजार घसरला

Stock Market : ७ दिवसांच्या तेजीला ब्रेक; शेअर बाजार घसरला

सेन्सेक्स ७२८ तर निफ्टी १८१ अंकांनी कोसळला, रिअल्टी आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री

मुंबई : सलग सात दिवसांच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ७२८ अंकांनी घसरून ७७,२८८ वर बंद झाला, तर निफ्टी १८१ अंकांनी घसरून २३,४८६ वर बंद झाला. बँक निफ्टीतही मोठी घसरण झाली असून तो ३९८ अंकांनी घसरून ५१,२०९ वर बंद झाला. बाजारातील सर्वाधिक विक्री आयटी आणि रिअल्टी क्षेत्रात दिसून आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगला प्राधान्य दिले. भारतीय कंपन्यांच्या मार्च तिमाही निकालांमध्ये काही कंपन्यांचे आर्थिक परिणाम कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेही बाजार घसरण्याची शक्यता आहे. ‘बाय चायना, सेल इंडिया’ हा ट्रेंड पुन्हा सक्रिय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनी शेअर्सच्या तुलनेत भारतीय शेअर्स महाग झाले असून परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मळवाट स्वीकारल्याने बाजारावर दबाव वाढला आहे.

Maharashtra Politics : ‘मविआ’चा रिव्हर्स गिअर; राम शिंदेंविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मागे का?

अमेरिकन बाजारात फार्मा आणि आयटी क्षेत्रांमध्ये मोठी विक्री दिसून आली. इराणवर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आणि कच्च्या तेलाच्या साठ्यातील घटेमुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळेही जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे.

निफ्टी ऑटो निर्देशांक वगळता एनएसईवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक, आयटी, हेल्थकेअर आणि रिअल्टी निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. विशेष बाब म्हणजे निफ्टी ऑटो निर्देशांकात केवळ ०.०२ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली गेली.

शेअर बाजार का घसरला?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगला प्राधान्य दिले.

भारतीय कंपन्यांच्या मार्च तिमाही निकालांबद्दलच्या अंदाजांमुळे बाजारावर दबाव दिसून आला. काही कंपन्यांचे निकाल Q4F25 मध्ये अपेक्षेपेक्षा कमजोर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘बाय चायना, सेल इंडिया’ ट्रेंड पुन्हा दिसू शकतो. चीनी शेअर्सच्या स्वस्त मूल्यांकनामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्सची विक्री करू शकतात.

अमेरिकन बाजारातील फार्मा आणि आयटी क्षेत्रांमध्ये मोठी विक्री दिसून आली.

इराणवर अमेरिकेचे नवीन निर्बंध आणि कच्च्या तेलाच्या साठ्यात घट होण्याच्या भीतीमुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली, याचा परिणाम बाजारावर दिसून आला.

सर्वाधिक नुकसान कोणत्या क्षेत्रांना?

  • निफ्टी ऑटो इंडेक्स वगळता एनएसईवरील सर्व सेक्टोरल निर्देशांक लाल रंगात बंद झाले.
  • निफ्टी पीएसयू बँक, आयटी, हेल्थकेअर आणि रिअल्टी निर्देशांक १% हून अधिक घसरले.
  • विशेष म्हणजे, निफ्टी ऑटो निर्देशांकात मात्र केवळ ०.०२% वाढ झाली.
  • आजच्या घसरणीनंतर बाजारातील गुंतवणूकदारांची नजर आता उद्याच्या ट्रेंड आणि ग्लोबल मार्केटमधील हालचालींवर राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -