Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसिंधुदुर्ग

Sindhudurg Underwater Museum : सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली पाण्यातील संग्रहालय उभारणार - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Sindhudurg Underwater Museum : सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली पाण्यातील संग्रहालय उभारणार - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाचे विविध प्रकल्प सुरू आहेत त्यापैकी काही प्रकल्प पूर्ण होत आहेत, तर काही प्रगतिपथावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राखाली पाण्यामध्ये आय एन एस गुलदार या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. लवकरच या संग्रहालयाची उभारणी करण्यात येत असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्पाबाबत सदस्य चंद्रकांत सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या उत्तरात पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, गुलदार युद्धनौकेची स्वच्छता करण्यात आली असून लवकर ती संग्रहालयासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०२१ - २२ ते २४ - २५ या कालावधीत १४९.६० कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहे. सावंतवाडी येथील उद्यान विकसित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात जागतिक दर्जाची स्कुबा डायव्हिंग सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

Comments
Add Comment